दुर्दैवी … शेततळ्यात बुडून दोन सख्या भावंडांचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना.

केज दि.27 जुलै – शेततळ्यात बुडून दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना केज (Kaij) तालुक्यातील लाडेवडगाव येथे दि.27 मंगळवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली.

(Unfortunately … two brothers drowned in a farm pond; Incidents in Kaij taluka.)

घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून पोलिस (Police) देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हर्षद माधव लाड (10 वर्ष) आणि उमेद माधव लाड (7वर्ष) असे शेततळ्यात (Farm ponds) बुडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांची नावे आहेत.

बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेल्या दोन महिन्यात अशा चार घटना घडल्या आहेत. सध्या पावासाळ्याचे दिवस असून शेतातील विहिरी, शेत तळे, ओढे, नाले पाण्याने मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत. अशा काळात आपल्या लेकरांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!