रविवारी दोनशेपार… बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.8 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्ह्यात  आज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी जिल्हा प्रशासनाकडे 5152 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 216 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4936 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांच्या संख्येत वाढ दिसून आल्यामुळे चिंतेत भर पडली.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-31, अंबाजोगाई-9, आष्टी-70, धारुर-3, गेवराई-18, केज-12, माजलगाव-31, परळी-3, पाटोदा-21, शिरुर-9, वडवणी-9 अशी आहे. आज आष्टी व माजलगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी 06 हजार 061 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 09 हजार 356 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 39 हजार 493 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.72 टक्के झाला आहे. आज 187 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.1 टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 33 हजार 845 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्यात 71 हजार 050 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 93 लाख 72 हजार 212 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 47 हजार 820 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 04 लाख 31 हजार 539 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!