केजमध्ये आढळले अज्ञात इसमाचे प्रेत…

केज दि.६ (प्रतिनिधी) – केज येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीत एक पुरुष जातीचे प्रेत (Dead Body) आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

दि. ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी केज (Kaij) येथील भिमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात एक पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्ष वयाचे अनोळखी कुजलेले प्रेत तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शेख युन्नूस चांद व गुलाब गुंड हे दुपारी ४ वा. च्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना प्रेत (Dead Body) आढळून आले. त्यांनी याची माहिती केज (Kaij) पोलीस स्टेशनला देताच सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे तसेच उपविभागीय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रेत पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून सदरील प्रकार हा घात की अपघात पोलीस (Police) तपासात निष्पन्न होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!