बीडच्या ‘रापम’ विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला मारहाण; महिलेची तक्रार.

बीड दि.19 अॉगस्ट – बीड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात (ST divisional office) एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने छेडछाड करत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पिडित महिलेने बुधवारी याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली असून महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.
(Beating of a female employee at Beed’s ‘ST’ divisional office; The woman’s complaint.)
बीड (Beed) येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालयात (State Transport Department Offices) महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली होती. यानंतर आता लेखा विभागात नवीन घटना समोर आली आहे. एक अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल (Accountant) नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर पिडित महिला वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जात असताना तिला अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नौकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकाराने बीड रापम कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सदरील महिला कर्मचाऱ्यास 5 ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक (Divisional Controller) अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली असता महिलेची डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडितेने सांगितले. तर माझ्या विभागात 10 ते 12 महिला कर्मचारी आहेत. सर्वांना आई-बहिणीप्रमाणे सन्मान देतो. माझ्यावर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ बदली पाहिजे म्हणून हा कट करण्यात आला असल्याचे सांगत या प्रकारामुळे माझीच मानसिकता खचली असल्याची प्रतिक्रिया लेखापाल नारायण मुंडे यांनी दिली.
सदरील प्रकाराची माझ्याकडे बुधवारी रात्री उशिरा तक्रार आली असून गुरूवारी सुट्टी आहे. प्रकाराबाबत शुक्रवारी दोघांनाही समोर बोलवून चौकशी केली जाईल असे बीड राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले. मात्र सदरील प्रकारामुळे पुन्हा एकदा बीड रापम विभागीय कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे.