राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मतदारसंघात रक्तदान शिबिर
सहभागी होण्याचे आ. सोळंके यांचे आवाहन

माजलगाव दि.७(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त माजलगाव मतदारसंघातील विविध रुग्णालयात दि.१० बुधवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. प्रकाशदादा सोळंके, जि.प. सभापती जयसिंग सोळंके यांनी केले आहे.
दिनांक १० जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस. येत्या १० जूनला पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पक्षादेशानुसार यंदा सर्वत्र रक्तदान शिबिर आयोजित करुन वर्धापन दिन साजरा होत आहे. दि.१० जून बुधवार रोजी सकाळी १०:१० वाजता आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव ग्रामीण रुग्णालय, धारूर ग्रामीण रुग्णालया, तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटर व वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जि.प.चे अर्थ व नियोजन सभापती जयसिंग सोळंके यांनी दिली. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. प्रकाशदादा सोळंके, सभापती जयसिंग सोळंके यांनी केले आहे.