ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल;

मुंबई दि.6 जून – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार मुळनाव युसुफ खान यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेतांना त्रास होत असल्यामुळे सकाळी 8.30 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. याविषयी अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो (Sayra Bano) यांनी माहिती दिली.

(Veteran actor Dilip Kumar admitted to Hinduja Hospital in Mumbai;)

“दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेतांना त्रास जाणवत होता. त्यामुळे आज सकाळी 8.30 वाजता त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं आहे. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ.जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुमच्या सगळ्याची प्रार्थना सोबत असल्यामुळे ते लवकरच बरे होतील”, असं सायरा बानो (Sayra Bano) यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

गेल्या वर्षभरामध्ये दिलीप कुमार यांना प्रकृती खालावल्यामुळे बऱ्याचदा रुग्णालयात दाखत करण्यात आले होते. दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे दिलीप कुमार यांच्या आजारपणात सायरा बानो या त्यांची प्रचंड काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘मुघल-ए-आझम’, ‘राम और श्याम’, ‘कर्मा’ आणि ‘सौदागर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!