व्हिडीओ न्यूज… बहुचर्चित अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला…

(व्हिडीओ खाली पहा)
किल्लेधारूर दि.25 जुलै – येथील धारुर घाट (Dharur Ghat) पायथ्यावरील अरणवाडी साठवण तलावाच्या (Storage pond lake) पाण्याचा विसर्ग अखेर सांडवा फोडून आज सकाळी 9 च्या सुमारास करण्यात आला.
(Video News … Sewage of much talked about Aranwadi storage lake burst …)
गेल्या तीन दिवसांपासून अरणवाडी साठवण तलावातील सांडवा फोडण्यासाठी प्रशासन व ग्रामस्थांत तणावाचे वातावरण होते. नवीनच बांधण्यात आलेल्या या तलावात पहिल्याच पावसाळ्यात 100 टक्के पाणी साठा झाला. यामुळे तलावाला धोका निर्माण होईल तसेच तलाव क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग (National Highway) खचण्याचा धोका असल्याचा पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले.
मात्र परिसरातील पाच गावातील ग्रामस्थांनी सांडवा फोडण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. यामुळे ग्रामस्थांनी रात्री गस्तही ठेवली होती. प्रशासनाकडून पोलिस (Police) व पाटबंधारे खात्याच्या (Department of Irrigation) अधिकाऱ्यानी रात्री एक वाजता ग्रामस्थांची भेट घेवून पावसाळ्यानंतर सांडवा पुर्ववत कलाण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर आज सकाळी सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.