बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा मंगळवारी कशी आहे तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.8 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 747 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 53 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 694 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-9, अंबाजोगाई-10, आष्टी-17, धारुर-5, गेवराई-4, केज-1, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-3, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) आकडेवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आज दहा तालुक्यात केवळ 53 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी 115 असलेली रुग्णसंख्या रविवारी 48, सोमवारी 41 तर मंगळवारी 53 बाधित आढळले आहेत. आज सर्वाधिक आष्टी तालुक्यात 17 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या सोमवारच्या नोंदीनूसार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2859 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 660 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 5.79 टक्के, रिकव्हरी रेट 96.74 तर डेथ रेट 2.64 आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात 6,436 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18,423 कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 78,10,136 झाली आहे. त्यापैकी 75,57,034 जण बरे झाले आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट 96.76 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात 1 लाख 06 हजार 059 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला.

आता पर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 098 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्याची कोरोना मृत्युदर 1.83 टक्के आहे. सध्या राज्यात 23,830 कोरोना रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहे तर 6,73,875 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पर्यंत राज्यात 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!