धक्कादायक … एकाच साडीने घेतला दोघी मावस बहिणींनी गळफास; लातूर शहरातील घटना.

लातूर दि.3 जुलै – लातूर शहरालगत हरंगुळ रोड येथील गोविंद नगर भागात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. घराच्या वरच्या मजल्यावर आडूला एकाच साडीने दोघी मावस बहिणींनी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. या दोघी मावस बहिणींनी गळफास का घेतला, हे मात्र अद्याप समोर आले नाही.

(Shocking … Two sisters strangled with the same sari; Incidents in Latur city.)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनूसार, लातूर (Latur) शहरालगत बार्शी रोड हरंगुळ परिसरात गोविंद नगर येथे विश्वकर्मा मंदिराच्या लगत एक कुटुंब वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास गितांजली दत्तात्रय बनसाडे आणि धनश्री संतराम क्षीरसागर या दोघी मावस बहिणी तळमजल्यातून आम्ही वरच्या पहिल्या मजल्यावर कपडे धुण्यासाठी जातो असे म्हणून गेल्या.

काही वेळातच त्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीच्या आत एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या केलेल्या गितांजली बनसोडे हीचे वय 17 वर्ष तर धनश्री क्षीरसागरचे वय 20 वर्ष आहे. दरम्यान, दोघींचेही कुटुंब घरातच होते. धुणे धुण्याच्या बहाण्याने वरच्या मजल्यावर गेलेल्या या मुली आत्महत्या करतील असे त्यांच्या कुटुंबातील कोणालाही वाटले नाही.

एमआयडीसी (Latur MIDC) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी दिलेल्या माहितीवरुन सध्या या आत्महत्येबाबत कोणतेही प्राथमिक कारण हाती आले नाही. अधिक तपास एमआयडीसी (Latur MIDC) पोलीस करीत आहेत. याबबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास पोलिस (Police) करत आहेत.

या प्रकारानंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. सदरील दोघी बहिणी काही दिवसांपुर्वी बेपत्ता झाल्या होत्या व पोलिसांनी त्यांना नुकतंच पुणे येथून शोधून पालकांच्या सुपुर्द केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप पोलिसांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट सांगितले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!