कळंबमध्ये वॉचमनचा खुन; शुक्रवारी मध्यरात्री घडली घटना.

कळंब दि.5 जून – शहरातील एका प्रतिष्ठित आडत व्यापाऱ्याकडे ‘वॉचमन’ (Watchman) म्हणून कार्यरत असलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तिची शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रमुख बाजारपेठचे शहर असलेल्या कळंबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेतली.

(Watchman’s murder in Kalamb; The incident happened at midnight on Friday.)

कळंब (Kallam) येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांचा आडत व्यावसाय आहे. याच आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुंटूब वास्तव्यास आहेत. जाधव यांच्या आडतीवर मागच्या वीस वर्षापासून मच्छिंद्र छगन माने (रा. फरीदनगर डिकसळ) हे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत.

शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माने हे जाधव यांच्या आडतीवर नाईट ड्यूटी बजावत होते. यादरम्यान, रात्री दोननंतर अज्ञात व्यक्तिंनी त्यांची निर्घृण हत्या (Murder) केली. सकाळी जाधव यांचा पुतण्या जॉगिंगकरीता घराबाहेर पडत असताना हा भयंकर प्रकार समोर आला. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. कळंब (Kallam) पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

मयत व्यक्तीच्या छातीवर गंभीर जखम असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय हा प्रकार दरोड्याच्या प्रयत्नातून झाला आहे की अन्य कशामुळे ते पण स्पष्ट झाले नव्हते. सदरील खूनाचा पुढील तपास कळंब पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!