BEED24

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक; माझ्यासोबत चाळीसपेक्षा जास्त आमदार- एकनाथ शिंदे.

मुंबई दि.22 जुन – आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून माझ्यासोबत चाळीसपेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती आज सकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडे शिंदे यांच्याकडून भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील आघाडी शासन औट घटकेचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सुरतमध्ये मेरेडीयन हॉटेलमध्ये ठेवलेले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे पंचेचाळीस आमदार आहेत. शिंदे समर्थक आमदारांचा एकत्रित फोटो वायरल झाला असून आमदारांचा हा गट आता गुवाहाटीकडे हलवण्यात आला आहे. सत्तांतरासाठी भाजपाला 37 आमदारांची गरज असून शिंदेकडे दोन तृतीयांश आमदार ( MLA ) असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असल्याचे बोलले जात आहे.

काल आणि आज आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून उद्याही शिवसैनिकच राहु असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. शिवसेना सोडण्याचा अथवा इतर पक्षात जाण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी सांगितले. विचारांची प्रतारणा करणार नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असून बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्रित आलो आहोत. बाळासाहेब आणि दिघेसाहेब आमचे दैवत असल्याचे सांगत त्यांच्या विचाराशी तडजोड करणार नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

( We are Balasaheb’s Shiv Sainiks; I have more than forty MLAs – Eknath Shinde. )

Exit mobile version