बीड जिल्ह्यात काय सुरु काय बंद; आपल्या मनातील शंकेचे उत्तर.

बीड दि.28 जून – आज दि.28 जूनपासून महाराष्ट्रात राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सुचना (guidelines) जाहिर केल्या आहेत. यानूसार सर्व जिल्हे तिसऱ्या व त्यावरील स्तरात समाविष्ट असणार आहेत. बीड जिल्हा यापुर्वीच तिसऱ्या स्तरात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या 5 जूनच्या आदेशाला पुढे वाढ दिल्याने आहे तेच निर्बंध (restrictions) व वेळा कायम राहणार आहेत.

(What started in Beed district closed; The answer to your doubts.)

मात्र आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती पहायला मिळत आहे. लोकांच्या मनातील शंका दुर करण्यासाठ व्यापारी संघटनांकडूनही व्यापाऱ्यांची शंका दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुठलाही बदल नसून खालीलप्रमाणे निर्बंध व सुट असणार आहे.

काय सुरु कशा आहेत वेळा …
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहणार
– मॉल्स, थिएटर बंदच राहतील
– रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 4 सुरू राहतील

– दुपारी 4 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
– सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
– खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
– चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परवानगी
– लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार

जिल्ह्यात आठवड्यात शनिवार व रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. म्हणजेच विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) सुरुच राहणार आहे. दिवसभर 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सांयकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

थोडक्यात ….
अत्यावश्यक सेवेतील (essential service) व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार, रविवार (weekend lockdown) वगळता आठवड्यातील 5 दिवस सुरु राहतील. हॉटेल 50 % क्षमतेने आठवड्यातील 5 दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी 4 नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी 4 वाजेपर्यंत आणि 50% क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील.

क्रीडांगण, मैदाने, पार्क सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!