चक्क राजकीय पुढाऱ्याच्या गाडीच्या दोन चाकांची चोरी; धारुर शहरातील प्रकार.

किल्लेधारूर दि.27 जुलै – धारूर (Dharur) शहरातील शिक्षक कॉलनी भागात राहणाऱ्या माजी जि. प. सदस्य माणिकराव भगवान मंदे यांच्या चार चाकी गाडीच्या दोन चाके चोरट्यांनी (Stealing two wheels) पळवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीची धारुर पोलिसांत (Police) नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

(Stealing two wheels of a political  leader’s car; Types of Dharur city.)

घराच्या बाजूला लावलेल्या स्विफ्ट कार (Swift car) क्र.एम एच 14 बि एक्स 3377 या गाडीचे दोन टायर डिक्स सह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन (Police station) मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेहमीच होणाऱ्या चोरीच्या प्रकारा मुळे शिक्षक कॉलनी भागातील रहिवाशी वर्गात भिती पसरली आहे.

धारूर शहरा लगत असणाऱ्या शिक्षक कॉलनी भागात चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी माजी जि. प. सदस्य माणिकराव मंदे यांनी आपल्या घराच्या बाजूस मोकळ्या जागेत नेहमी प्रमाणे आपली चारचाकी स्विफ्ट कार क्र. एम एच 14 बि एक्स 3377 रात्री लावली होती. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गाडीचे एका बाजूचे दोन्ही टायर डिक्स सह चोरून नेले. हि घटना मंगळवारी सकाळी लक्षात आली.

चक्क माजी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या पुढाऱ्यांच्या गाडीवरच चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. धारूर पोलीस स्टेशनला या बाबत तक्रार देण्यात आली असून या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र या भागात घडणाऱ्या नेहमीच्या घटना मुळे नागरीकांत भिती निर्माण झाली असून पोलीसानी रात्रीची गस्त याभागात सुरू करावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!