घात अपघात

घरातून निघून गेलेली पत्नी परतताच पतीला आला राग; केला विवाहितेचा खून, आष्टीतील घटना.

आष्टी दि.12 मे – आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेली विवाहिता बुधवारी (दि.11) घरी परतताच सासरी बेदम मारहाण करण्यात आली. यात विवाहितेचा मृत्यू झाला असून विवाहितेचा पती, सासरा व दिरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील विवाहित महिला मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले (वय 23) ही काही दिवसापुर्वी कोणाला काही न सांगता घरातुन निघुन गेली होती. ती बुधवारी घरी परता आली. याच कारणावरून घरात वादाला सुरुवात झाली. पती, सासरा, दिराने संगनमत करून मनिषा उर्फ सोनाली वाघुले हिला सायंकाळी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मुत्यु झाल्याची घटना 11 मे रोजी सायकांळी साडेपाचच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मयत महिलेची बहिण अश्विनी रमेश राळेभात रा.जामखेड जि.अहमदनगर हिच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी पती बाबासाहेब अशोक वाघुले, सासरा अशोक नारायण वाघुले, दीर प्रकाश अशोक वाघुले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.

दरम्यान, आष्टी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पत्नीचा खून करून पती मिरजगांव, कडा या ठिकाणी केरूळ येथे लपुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर व पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे यांनी होमगार्ड महेश जाधव व वाहन चालक पठाण यांच्या मदतीने अवघ्या तीन तासात आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.

( When the wife left home, the husband became angry; Murder of a married woman, incident in Ashti. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!