बीड जिल्ह्यातील या आमदाराने कुठे केली दिवाळी साजरी….  

आष्टी दि.१५ (प्रतिनिधी) राजकारणात नेहमीच वेगवेगळे हातखंडे वापरणाऱ्या बीड Beed  जिल्ह्यातील विधान परिषदेचे आमदार आ.सुरेश धस Suresh Dhas यांनी यंदा उसतोड मजुरांच्या पालावर जावून दिवाळी Diwali साजरी केली.

नेहमी चर्चेत राहणारे आमदार अशी ओळख असलेल्या आ.सुरेश धस Suresh Dhas आज उसतोड मजूरासोबत दिवाळी Diwali साजरी करत असल्याने चर्चेत आहेत. या वर्षी ऊसतोडणी मजुरांना भाववाढ मिळावी यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. सर्व ऊसतोडणी मजुरांच्या संघटनांना सोबत घेऊन त्यांनी ऊसतोड कोयता बंद आंदोलन केले. त्या अगोदर लॉकडाऊन काळात मजुरावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यावर्षी ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात संबंधी नवीन करार होणार असल्याचे निमित्ताने त्यांनी दीडशे टक्के दरवाढ पाहिजेत अशी भूमिका घेतली असून ही भाववाढ मिळाली तरच ऊसतोड मजूर मजुरांना त्यांचे श्रमाचे चीज होणार आहे. या उसतोडणी मजुरांचे जीवनात दसरा-दिवाळी Diwali कधीच नसते असतो तो शिमगा त्यामुळे या वर्षी ऊसतोडणी हंगाम सुरू झाल्यावर ऊसतोड मजूर बंधू भगिनींच्या आरोग्याची, पिण्याच्या पाण्याची, दवाखान्याच्या अडचणी, राहण्याचे ठिकाणातील अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आ. सुरेश धस Suresh Dhas यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यावरील मजुरांमध्ये जाऊन दिवाळी Diwali साजरी करत आहेत. काल त्यांनी कोयत्याचे पूजन करून लक्ष्मीपूजन डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी जि.सांगली या ठिकाणी जयराम बांगर, गोकुळ बावणे, जयराम बावणे, आसाराम जगताप वाघिरा ता.पाटोदा या उसतोड मजुराच्या पालात जाऊन केले. या तीन दिवसांच्या संपूर्ण दौऱ्यात दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी महिला मजुरांनी पाणी, सार्वजनिक शौचालय, दवाखाने नसल्याचे सांगितले. यावर आपण प्रशासनाकडे याची तक्रार करू असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!