Krushibhushan धारुरच्या कन्येने मिळवला कृषीभुषण पुरस्कार…

किल्लेधारूर दि.24 फेब्रुवारी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा जिजामाता कृषी भुषण Krushibhushan पुरस्कार धारूर येथील फुल शेती करून महिला पुढे आदर्श ठेवणाऱ्या प्रियंका गणेश सांवत यांना शुक्रवारी जाहीर झाला. 1 लाख 20 हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह व 15 हजार रुपये प्रवास भत्ता असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी, शेतीमित्र, संशोधक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सन 2020 पासूनच्या पुरस्कारांची घोषणा कोविडमुळे झालेली नव्हती. शुक्रवारी 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात धारूर येथील प्रियंका गणेश सांवत यांना सन 2020 सालचा जिजामाता कृषी भुषण Krushibhushan पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी उत्कृष्ट केलेल्या फुल शेतीची दखल घेत हा पुरस्कार दिला गेला. लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल सावंत यांचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाशदादा सोंळके, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर, तालुका कृषी अधिकारी एस डी शिनगारे यांच्यासह कार्यालयीन सहकारी, मित्र परिवार, नातेवाईक, पञकार व नागरीकानी कौतूक केले आहे.