धारुर तालुक्यात वानवा पेटला; डोंगरावरील हजारो झाडे जळून खाक.

किल्ले धारूर दि.21 फेब्रुवारी – धारुर (Dharur) तालूक्यातील खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) बाजूला आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूला असणाऱ्या डोंगराला सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगी मुळे हजारो झाडे जळून खाक झाली. आसपास चे ग्रामस्थांनी ही आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
( Wildfire erupts in Dharur taluka; Burn thousands of trees on the mountain. )
तालूक्यातील खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्ग ( NH548C ) रस्त्यावर आरणवाडी साठवण तलावाच्या पुर्व बाजूस रस्त्याचे वरील शासकीय गायरान (Government Land) असलेल्या डोंगरास सोमवारी दुपारी बारा ते साडे बाराच्या दरम्यान अचानक आग लागली. या लागलेल्या आगी मुळे चार ते पाच एक्कर डोंगर जळून खाक झाला.
या डोंगरावरील सर्व वनराई नष्ट झाली असून वानवा (Wildfire) वाढतच आहे. या डोंगरावरील सिताफळ ( Custard apple ) व इतर झाडे जळून खाक झाली. यामुळे मोठे नुकसान झाले. हि आग अटोक्यात आणण्या साठी आस पासच्या ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र तत्पुर्वीच आगीमुळे मोठे नुकसान झाले होते.
रस्त्याचे बाजूलाच हा डोंगर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील प्रवाशी थांबून हि घटना पहात होते. या आगीमुळे वृक्षासह वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात येत आहे असे वाटत असताना सायंकाळी या आगीने भंयकर रुप धारण केले होते. रात्रीतून हवेमुळे आग परिसरातील डोंगरावर पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.