नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणार ? काय आहे सत्यता…

52 / 100

मुंबई दि.10 जुलै – नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दोन दिवसांपूर्वीच जाहीर केल्या आहेत. पण या निवडणुका होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात गेली तीन दिवस सततधार पाऊस सुरु आहे. यातच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील 17 जिल्ह्यात 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा (municipal elections) कार्यक्रम जाहिर केला. मात्र सध्या पावसाळा सुरु असून अडचणी निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल, त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यावर आयोगाशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना, ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) प्रकरण सध्या न्यायालयात दाखल आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे. परंतू आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सध्या सगळीकडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी (State Election Commission) चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

यासोबतच माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही होवू घातलेल्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होवू नये अशी मागणी केली आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार सदर निवडणूका जाहिर झाल्या असून पुर्वानूभवामुळे निवडणूका घेण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

दरम्यान, ओबीसीचा इंपेरियल डेटा आयोगाने दाखल केला असून 12 जुलै रोजी न्यायालयात याविषयी निकाल लागण्याची शक्यता आहे. यामुळे ओबीसी शिवाय निवडणूका नको असा पवित्रा विद्यमान सरकारने घेतला आहे. तर जनतेतून नगराध्यक्ष पध्दतीचा विचारही राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. पावसामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा निकाल व राज्य सरकारची भुमिका यामुळे नगरपालिकेच्या जाहिर झालेल्या निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( Will municipal elections be postponed? What is the truth … )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!