माझं गाव

धारुर तालुक्यात बाळंतपणात महिलेचे निधन; व्हरकटवाडीत हळहळ.

किल्ले धारूर दि.31 मे – धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी येथील शेतकरी महिलेचे बाळांतपणात दुःखद निधन झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी रखमाजी व्हरकटे (वय 19) मयत महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी वैष्णवी ची प्रसूती लातूर येथील शासकीय रुग्णालयात झाली. तेव्हापासून ती कोमात होती. मंगळवारी सकाळी वैष्णवीची प्राणज्योत ” ली. मात्र बाळ सुखरूप असल्याचे नातेवाइकांकडून समजले.

वैष्णवीच्या निधनाचे वृत्त व्हरकटवाडीत कळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. व्हरकटवाडी गावच्या सरपंच ललिता रामकिसन व्हरकटे यांची ती वहिनी होत. वैष्णवी पश्चात सासू-सासरे, पती व एक लहान नवजात बालक आहे.

( Woman dies in childbirth in Dharur taluka; The hustle and bustle in Varkatwadi. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!