कोरोंना विशेष

चिंताजनक … राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 7 रूग्ण आढळले.

मुंबई दि.20 जून – देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा (Third wave of corona) धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने (Delta Plus variant) राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर नवे संकट उभे केले आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे 7 रूग्ण महाराष्ट्रात आढळलेले आहेत.

(Worrying … 7 patients of Delta Plus variant were found in the state.)

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या कोरोना विषाणू (Corona virus) उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस (Delta Plus variant) हा नवा विषाणूचा (Corona virus) प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे नवे सात रुग्ण आढळून आहेत. त्यामुळे नागरिकांना आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. डेल्टा या व्हेरियंटच्या म्युटेशनमधून डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जोखीम अधिक वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बरे होणाऱ्यात अनेक आजार समोर येत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओरसत असताना तिसरी लाट (Third wave of corona) आली तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 ते 10 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तसंच याचा 10 टक्के लहान मुलांवर परिणाम होईल असा इशाराही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत.

नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांतील काहींचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यांचे अंतिम अहवाल लकरचं मिळतील अशी माहिती डीएमईआरचे संचालक डॉ. लहाने यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या मागील काही दिवसापासून कमी होत आहे. मात्र कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकण पट्ट्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) वेगाने वाढत असल्याचे दिसुन येत आहे. आता तिसऱ्या लाटेत या डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग (Corona infection) किती होणार याची चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!