चिंताजनक…. बीड जिल्ह्याची आजची संख्या सव्वाशेकडे … केजमध्येही 10 रुग्ण.

बीड दि.7 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1222 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 122 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1100 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग पाचव्या दिवशी सर्वाधिक 51 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळली आहेत. केज तालुक्यातही 10 रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Worrying …. Corona’s century has passed in the district …. See taluka wise statistics …)
1. बीड- 51 7.माजलगाव-2
2. अंबाजोगाई-16 8.परळी-4
3. आष्टी-16 9.पाटोदा-4
4. धारुर-1 10.शिरुर-5
5. गेवराई-12 11.वडवणी-1
6. केज-10
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.7 रविवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आज आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने 10 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्याची कालची संख्या 108 होती ती वाढून आज 122 रुग्ण संख्या झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना आकडा पाहता प्रशासनाने 31 मार्चपर्यंत सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश दिले आहेत.