चिंताजनक… वॉशिंग्टनच्या विद्यापिठाचा अंदाज खरा ठरणार? देशात मृत्यूची आकडेवारी वाढली.

नवी दिल्ली 8 मे – शुक्रवारी प्रथमच एका दिवसात 4,191 तर शनिवारी 4 हजार 187 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (Corona Death) भारतात झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू कोरोना काळाच्या 3 महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा पुन्हा 4 लाखांपेक्षा जास्त समोर आला आहे.
(Worrying … will the University of Washington’s prediction come true? The death toll in the country has risen.)
देशातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 2,18,86,556 झाली असून त्यापैकी 1,79,17,013 रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांत सुमारे 8 हजारांची घट झाली आहे.
देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू (Corona Death) होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या 24 तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 इतकी झाली आहे.
देशात कोरोनाचं थैमान सुरू असून, कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे.
दरम्यान, देशात सध्याच्या घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (The second wave of corona) भलतीच चिंता वाढवली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून चार लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबळींचा (Corona Death) आकडाही धडकी भरवू लागला आहे.
दुसरी लाट (The second wave of corona) थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी सरकारला कोरोना लसीकरण (Vaccine) मोहिमेला गती देण्याचा एक पर्याय समोर दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कोविशिल्ड लसीच्या (Vaccine) 50 लाख डोसची ब्रिटनवारी थांबवली आहे.