कोरोंना विशेष

पत्रकारांना सुरक्षा किटचे वाटप

बालाघाट प्रतिष्ठाणचा उपक्रम

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर)  येथील बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने पत्रकारांना सुरक्षा किट चे वितरण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील व तालूक्यातील पत्रकार जनमानसात जाऊन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांची सुरक्षितता राखण्यासाठी
सुरक्षा किट  चे वितरण नगराध्यक्ष डाॕ. स्वरूपसिंह हजारी यांच्या बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या मध्ये एन 95 मास्क, सॕनिटायजर, टोपी, हॕन्ड वाॕश आदी वस्तूचा समावेश आहे. यावेळी पञकाराना सुरक्षितते बद्दल डाॕ. हजारी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी शहरात एक हजार पाचशे गरजवंतांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे डॉ. हजारी यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील पत्रकारांसह स्विकृत सदस्य सचिन दूबे, माजी नगरसेवक  बाळासाहेब गायकवाड, ॲड. मोहन भोसले, विरेंद्र अवस्थी, बाळू सिरसट यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!