धक्कादायक… भावाने केला बहिणीचा शिरच्छेद; ‘सैराट’ मधील प्रसंगाची आठवण करुन देणारी अॉनर किलिंगची घटना.

औरंगाबाद दि.6 डिसेंबर – औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथे घडलेल्या धक्कादायक ‘सैराट’ मधील प्रसंगाची आठवण करुन देणाऱ्या अॉनर किलिंगच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या अशा घटनांचा निषेध नोंदवला जात आहे.

(Shocking … brother beheads sister; An incident of honor killing reminiscent of an incident in ‘Sairat’.)

काय आहे घटना
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गोळेगाव येथे एक अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला आहे. बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या (Murder) केली. ही हत्या अतिशय अमानुषपणे करण्यात आली असून यामध्ये भावाने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे.

हत्या करुन आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात (Police Station) आत्मसमर्पण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला.

सैराट (Sairat) चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच औरंगाबादमधील (Aurangabad ) लाडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 19 वर्षीय किशोरी मोटे हिने सहा महिन्यापूर्वी पळून जाऊन पुण्यातील आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते लाडगाव शिवारात राहण्यासाठी आले होते.

ही माहिती मिळताच भाऊ संकेत मोटे यानं लाडगाव गाठलं. त्यानंतर बहिणीला प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. यावेळी राग अनावर झालेल्या भावाने जवळच असणाऱ्या कोयत्यानं बहिणीवर सपासप वार केले. भावाने इतक्या निर्घुणपणे वार केले की बहिणीचं मुडक शरीरा वेगळं झालं होतं.

हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवलं. घटनेचं गांभिर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मात्र पुरोगामीत्वाची ओळख असलेल्या महाराष्ट्रात या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!