अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू.

माजलगाव दि.16 सप्टेंबर – अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार दि.16 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माजलगाव शहराच्या बाहेर सिंदफणा पुलाजवळ घडली. अर्जुन गणेश उगले (वय 23) रा. चिंचगव्हाण असे अपघातात (Accident) ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

(Young man killed in unidentified vehicle crash)

अर्जुन उगले हा गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून परभणी रस्त्यावरील एका गॕरेजवरून माजलगाव शहरात येत होता. त्याची दुचाकी शहराबाहेरील सिंदफणा पुलाजवळ आली असता अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अर्जुन उगले हा गंभीर जखमी झाला.

काही नागरिकांनी त्याला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच अर्जुन उगले याचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

त्याच्यावर सायंकाळी धरणाच्या शेजारील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने चिंचगव्हाण गावावर शोककळा पसरली होती. माजलगाव (Majalgoan) शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून अपघाताची संख्या वाढली आहे. सदरील अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!