BEED24

धारुर पोलिस हद्दीत युवकाची आत्महत्या; तीन दिवसांपासून बेपत्ता होता तरुण.

किल्ले धारूर दि.5 एप्रिल – आडस ता.केज येथील एका तरुणाचे प्रेत आसरडोह रस्त्यावरील विहिरीत मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आढळून आला. त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली जात असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सदर तरुण तीन दिवसांपासून बेपत्ता होता.

शेख निसार तुराब रा. आडस ता. केज असे मयत तरुणाचे नाव आहे. निसार हा शनिवार (दि.2) पासून घरातून बेपत्ता होता. त्याचा कुटुंबातील व्यक्तींनी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. मंगळवारी (दि.5) दुपारी पाण्याचे खाजगी टँकर पाणी आणण्यासाठी रामदास विश्वनाथ ढोले यांच्या आसरडोह रस्त्यावरील शेतातील विहीरीवर गेले होते. त्यावेळी पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला.

याची खबर धारुर (Dharur) पोलीसांना देताच सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) विजय आटोळे, एएसआय गोविंद बास्टे यांच्यासह आदी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढलं असता तो शेख निसार तुराब याचा असल्याचे कुटुंबातील व्यक्तींनी ओळखले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात (SRTR) पाठविण्यात आला आहे.

तरुणाने आत्महत्या (Suicide) का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निष्पन्न होईल. या घटनेमुळे आडसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत.
( Youth commits suicide in Dharur police precinct; The young man had been missing for three days. )

Exit mobile version