वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांस डॉक्टर्स असोशिऐशनची आर्थिक मदत;

किल्लेधारूर दि.१९ (वार्ताहर) येथील रहिवासी व सध्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव Dr.Ulhas Patil Medical college, Jalgoan येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुपेश दिनेश उगले या विद्यार्थ्यांस लॉकडाऊनमुळे lockdown आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांस आर्थिक मदतीचे आवाहन बीड२४ Beed24 न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदरील विद्यार्थ्यांस धारुर शहर व जिल्ह्यातील दातृत्व स्विकाणाऱ्या संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु झाला असुन आज येथील डॉक्टर्स doctors असोशिऐशनच्या वतीने १८५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत गतवर्षी निट परिक्षेत ५२७ गुण घेवून वैद्यकीय परिक्षेस रुपेश दिनेश उगले प्रवेशपात्र ठरला. मात्र रुपेशला पहिला फटका ७०:३० चा बसला. या नियमामुळे जास्त गुण असतानाही रुपेशला निमशासकीय कोट्यातून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव Dr.Ulhas Patil Medical college, Jalgoan येथे शिक्षण घेण्याची वेळ आली. घरात अठरा विश्व दारिद्रय असताना समाजातील पतपेढी व काही दात्यांच्या मदतीमधून प्रथम वर्ष पुर्ण झाले. लॉकडाऊन Lockdown मध्ये वडिलांच्या हातचे काम गेल्याने पतपेढीचे आठ महिन्याचे हप्ते थकले. पतपेढीच्या तकाद्यामुळे वडिलांना हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. अत्यंत बिकट परिस्थिती मुळे रुपेशला आर्थिक मदतीची गरज असुन समाजातील दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. दानशुर व्यक्तीनी रुपेश मो.न.8698313206 रुपेश दिनेश उगले SBI धारूर a/c 62489464181, IFSC SBIN0020032 यावर मदत करावी असे आवाहन बीड२४ Beed24 न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आवाहनाला अनेकांनी सकरात्मक प्रतिसाद दिला असुन काल दि.१८ रोजी येथील डॉक्टर्स असोशिऐशन doctors कडून उगले दाम्पंत्यास १८५०० रुपयांची रोख मदत नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, डॉक्टर्स doctors association असोशीयशनचे अध्यक्ष डॉ. मयूर सांवत यांचे हस्ते करण्यात आली. यापुढेही त्याला सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी डॉ. डि. एन. मुंडे, डॉ. बि. आर. सोळंके, डॉ.राम शिनगारे, डॉ.सुंदर जायभाये, डॉ. गोकूळ शिनगारे, डॉ. भगवान तोंडे, डॉ. मंञी, पत्रकार अनिल महाजन आदी उपस्थीत होते. याशिवाय उगले यास आप आपल्या परिने मदत सुरुच असुन बीड२४ Beed24 न्यूज पोर्टलच्या वतीने दात्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.