अंबाजोगाई वगळता बीड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा
रुग्ण संख्या अर्धशतक पार

बीड : बीड जिल्ह्यासाठी काल दिवसभरात एकूण ८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या परळी व शिरुर तालुकेही कोरोनाग्रस्त बनली असून जिल्ह्यात सध्या थारी अंबाजोगाई तालुका कोरोनामुक्त दिसून येत आहे.
काल दुपारी रिपोर्ट आलेले दोन बाधित हे बीड शहरातील दिलीपनगर (पंचशील नगरच्या बाजुस) भागातील आहेत. ते मुंबईच्या नरसीपाडा भागातून दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते. तर कोरोनामुक्त असलेल्या परळी व शिरुर कासार तालुक्यातही चार बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील अकरा पैकी दहा तालुके कोरोनाग्रस्त झाली आहेत. कालच्या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या अर्धशतक पार करत ५५ झाली आहे. जिल्ह्यात सध्या अंबाजोगाई तालुका कोरोनामुक्त समजला जात आहे. जिल्ह्यात आढळलेली सर्वच रुग्ण मुंबई भागातून आलेली आहेत. दि.२६ पासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन मध्ये मोठी शिथिलता दिली असून रुग्ण संख्या वाढत असल्याने यात पुन्हा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.