कोरोंना विशेष

आजही निगेटिव्हची संख्या अधिक…. आज आले येवढे पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) ३२ दिवसानंतर काल धारुरकरांना दिलासा मिळाला. काल पाठवलेल्या ३७ स्वॅब पैकी ३ अहवाल पॉझिटीव्ह तर ३४ अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज आलेल्या अहवालात शहरातील तीन महिलांचा पॉझिटीव्ह रुग्णांत समावेश आहे.

शहर व तालुक्यात आज ३३ व्या दिवशी तीन महिलां रुग्णांची भर पडली. काल येथील कोविड केअर सेंटरमधून ३७ स्वॅब पाठवण्यात आली होती. यातील ३४ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धारुरकरांना दिलासा मिळाला आहे. आज केवळ १७ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत तर दोन ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आलेल्या रुग्णांत दोन महिला गायकवाड गल्लीतील तर एक बाराभाई गल्लीतील आहे. संबधितांना आरोग्य विभागाकडून सुचना देण्यात आल्या असुन उपचारार्थ विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या दोन दिवसात मंदावली असल्याने धारुरकरांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!