कोरोंना विशेष

आज धारुरात तीन सहवासितासह चार पॉझिटीव्ह

किल्लेधारूरः  दि.११आगस्ट- काल पाठवलेल्या ४१ अहवालात शहरातील ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत तर गोपाळपूर येथील एक जन आज केलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळला आहे. यामुळे आज शहरात चार पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली.

शहरात गेल्या बारा दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत आज ४ ची भर पडली. ४१ स्वॅब पैकी ३ सहवासीत पॉझिटीव्ह आली आहेत तर एक ॲन्टीजन अशी ४ पॉझिटीव्ह रुग्ण  वाढली आहेत. आज आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात एक पोलिस कर्मचारी तर दोन शिक्षक कॉलनीतील पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासीत आहेत. आजच्या अहवालात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. सदरील अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान धारुरचा ॲक्टीव रुग्णांचा आकडा तीन ने वाढून सव्वीस झाला आहे. काही वेळात जिलौह्याची आकडेवारी जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!