कोरोंना विशेष

आज धारुरात ५ पॉझिटीव्ह; एक नवीन तर ४ सहवासित

बीडः दि.१५;आगस्ट- काल पाठवलेल्या ४४ अहवाला पैकी आज पुन्हा शहरातील ४ व गोपाळपूर येथील एक असे ५ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात गोपाळपूर येथील मुंबईहून परतलेला एक नवीन तर ४ शहरातील पॉझिटीव्ह रुग्णाच्या  सहवासित आहेत.

शहरात आज १६ व्या दिवशीही ४ रुग्णांची भर पडली. तर गोपाळपूर येथे मुंबईहून परतलेला १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. ४४ स्वॅब पैकी ५ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात

१) १६ वर्षीय स्त्री ( गोपाळपूर, नवीन)
२)६३ वर्षीय पुरुष,(बाराभाई गल्ली, धारुर शहर, सहवासित )
३)२१ वर्षीय पुरुष,(बाराभाई गल्ली, धारुर शहर, सहवासित)
४)५० वर्षीय पुरुष,(शिक्षक कॉलनी, धारुर ग्रामीण, सहवासित )
५)२६ वर्षीय स्त्री,(जगनाथ नगर, लक्ष्मी नगर, धारुर शहर, सहवासित )

आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु करण्यात आलेला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!