कोरोंना विशेष

आज ४० स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; सर्वाधिक स्वॅब गांवदरा येथील

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) काल धारुरचे ४० लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा अहवाल रात्री प्राप्त होणार आहे. आज प्राप्त होणाऱ्या अहवालात गांवदरा येथील ३० लोकांच्या स्वॅब अहवालाचा समावेश आहे.

गेली २९ दिवस दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखलेत कालचा दिवस सर्वाधिक पॉझिटीव्ह संख्येचा होता. काल शुक्रवारी माजलगाव व धारुरचा १९ पॉझिटीव्हचा आकडा जिल्ह्यात सर्वात वरचा होता. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ४० लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. तालुक्यातील गांवदरा येथील पॉझिटीव्ह आढळून आलेल्या मयत वृध्दाच्या अंत्यविधीत जवळचा संपर्क येणाऱ्या ३० लोकांच्या अहवालाचा यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!