कोरोंना विशेष

आता धारुरमध्येही होणार ताप रुग्णांची स्वतंत्र तपासणी

किल्लेधारूर दि.(वार्ताहर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील तापीचे रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले असून लवकरच त्याची सुरुवात होणार आहे.

सध्या कोरोनामुळे आरोग्य प्रशासन सतर्क आहे. भविष्यातील धोका ओळखून रुग्णालयाची अपुरी संख्या वेगवेगळ्या माध्यमातून तत्पर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणीबाणीच्या परिस्थितीत अपुरे पडु शकते. तसेच सामान्य रुग्णांना याचा फटका बसु शकतो. यामुळे ताप सदृश्य रुग्णांसाठी स्वतंत्र इमारतीत तपासणी केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील शासकीय मुलींच्या वस्तिगृहात कोविड १९ फिवर क्लिनिक सज्ज करण्यात आले आहे. लवकरच तापीच्या रुग्णांची तपासणी सदरील ताप उपचार केंद्रात सुरु करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!