आता धारुर, पाटोदा, शिरुर (का), वडवणीसह मोठ्या गावात सर्व प्रकारच्या व्यावसायिक, दुकानदारांच्या ॲन्टीजन तपासणीचे नियोजन….

बीड दि.६:-जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी उर्वरित धारुर, पाटोदा, वडवणी व शिरुर कासार शहरासह मोठ्या गावात सर्व प्रकारच्या व्यवसायिक, दुकानदारांच्या ॲन्टीजन तपासणीसाठी जिल्हा प्रशासन नियोजन करत असुन लवकरच अधिकृत तारखां जाहिर करुन तपासणी सुरु होणार आहे.

बीड, गेवराई येथे ॲन्टीजन तपासणी झाल्यानंतर जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी आणि परळी वै. या शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अॅन्टिजन तपासणी (Antigen Test) दि.१८ ते २० ऑगस्ट २०२० रोजी राबविण्यात आली होती. या तपासणीत मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातून ॲन्टीजन तपासणीची मागणी होती. दि.५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी धारुर येथे घेतलेल्या आढावा बैठकीतही यावर चर्चा झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकरात्मक प्रतिसाद देत ॲन्टीजन तपासणी करण्याचे संकेत दिले होते. दि.५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजन करण्याचे आदेश काढले आहेत. सर्व नियोजन झाल्यानंतर लवाकरच तारखा जाहिर करुन अभियान राबवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!