उद्या होणार दहावीचा निकाल जाहिर….

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहिर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या दुपारी १ वाजता अधिकृतरित्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.
कृपया बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….