एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणी
२०० जिल्हा आणि तालुका संघांचे राज्यपाल विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन

मुंबई : मराठी पत्रकार नपरिषदेचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस. एम.देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशा मागणीचे 200 पेक्षा जास्त ़इमेल राज्यातील जिल्हा आणि तालुका संघांचयावतीने राज्यपाल तसेच विविध राजकीय पक्षांच्या प़मुखांना पाठविण्यात आले आहेत..
राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच होत आहेत.. राज्यपालांनी विचारवंत, साहित्यिक, कलावंत, पत्रकारांची परिषदेवर वर्णी लावावी अशी अपेक्षा असते.. राज्यपालांसाठी हा कोटा ठेवताना घटनाकारांची देखील हीच अपेक्षा होती.. त्यादृष्टीने विद्यमान राज्यपाल आग्रही असल्याचे सांगण्यात येते..
एस.एम.देशमुख हे गेली ३५ वर्षे पत्रकारितेत असून २३ वर्षे विविध दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.. त्यांची लेखणी जन सामांन्यांसाठी झिजत राहिली आहे..पत्रकारांचे राज्यात उत्तम संघटन तयार करून मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन सारखे प़श्न धसास लावले.. देशमुख उत्तम लेखक आहेत त्यांची आठ पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. विविध २२ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.. अष्टपैलू व्यक्तीगत असलेल्या देशमुख यांची परिषदेवर नियुक्ती व्हावी यासाठी राज्यातील पत्रकार आग़ही आहेत.. एस.एम देशमुख यांची नियुकी झाल्यास पत्रकारांचे प्रश्न तर सुटतील त्याच बरोबर जनसामान्यांचा आवाज देखील विधान परिषदेत दुमदुमत राहणार असल्याची खात्री पत्रकार आणि जनतेला आहे. त्यामुळे राज्यपालांनी एस.एम.देशमुख यांची परिषदेवर नियुक्ती करावी, राजकीय पक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करावी अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष यशवंत पवार, शिवराज काटकर, राजेंद्र काळे, प्रमोद माने, योगेश कोरडे, सुरेश नाईकवाडे, तसेच राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, मन्सूर भाई, विजय मोकल, राठोड, विशाल साळुंखे, प़काश कांबळे, तसेच परिषदेचे अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.