धक्कादायक …! बेवारस दुचाकीजवळ आढळला मानवी सांगाडा; पहा काय आहे प्रकार…

गेवराई दि.26 फेब्रुवारी – गेवराई शहरालगत असलेल्या एक निर्जन ठिकाणी बेवारस दुचाकी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ते पहाण्यासाठी गेलेल्या पोलीसांना एक मानवी सांगाडा झाडावर लटकलेला आढळून आला. यामुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे.

( Exciting …! Human skeleton found near unattended bike; See what’s the type … )

गेवराई (Gevrai) शहराच्या लगत पालखा डोंगर म्हणून ओळखले जाणारे एक निर्जन ठिकाण आहे. या डोंगराजवळ एक दुचाकी बेवारस अवस्थेत असल्याची माहिती गेवराई पोलीसांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले. दुचाकी कोणी घेऊन आलेला आहे का? परिसराची पाहणी करताना धक्कादायक चित्र समोर दिसले.

मानवी सांगाडा (skeleton) खाली पडलेला आहे तर मुंडकं झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती कळवून तो सांगडा ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण (SRTR) रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.

या अहवालानंतर हा सांगडा कोणाचा हे समजेल परंतु काही दिवसांपूर्वी एक मिसींग दाखल असून पोलीस (Police) प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहे. दरम्यान, सदरील सांगाडा मिळाल्याचे वृत्त गेवराई शहरात पसरताच खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!