शैक्षणिक

‘कोरोना’ संकटामूळे अनेक राज्यातील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद.

नवी दिल्ली दि.29 मार्च- देशात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती स्फोटक बनत चालली आहे. विशेषत: काही राज्यांमध्ये कोरोना स्थिती गंभीर बनताना दिसत आहेत. अशात नव्या शैक्षणिक वर्षांत शाळा सुरु होणार का, असा प्रश्व उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वर्षातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्रासह पंजाब, पुदुचेरी, गुजरात, हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष करुन पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

(Many schools in the state are closed till further orders due to the ‘Corona’ crisis.)

महाराष्ट्र (Maharashtra), पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे या राज्यात शाळा (schools) सुरु होण्याची शक्यता नाही. गतवर्षी 2020 च्या मार्चपासून देशात कोरोनाने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले. शाळाही बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागले.

काही दिवसांनी विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करुन ऑनलाईन शिक्षण (Online education) सुरु करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य नसल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र दिसून आलं होतं. त्यामुळे 50 टक्के क्षमतेसह आणि कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. पण, राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नव्या शैक्षणिक वर्षात शाळा बंदच राहण्याची शक्यता आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातील किमान 10 राज्यांनी शाळा तुर्तास सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत. शिवाय लहान मुलांसाठी अजून कोरोना लस उपलब्ध झालेली नाही. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंद राहतील. विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक सत्रातही ऑनलाईन शिक्षण (Online education) पद्धतीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!