कोरोनाचा सातवा बळी; मृतांचा आकडा वाढला!

बीडः जिल्ह्यात शनिवार व रविवार कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढणारा ठरला असून रविवारी संध्याकाळी आष्टी तालुक्यात एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने रात्ररी उशिरा जाहिर केले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह मृतांचा आकडा सात झाला असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या २४८ अहवालात सहा नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. यात आष्टी तालुक्यातील गंगादेवी येथील एका ६५ वर्षीय वृध्दाचा समावेश होता. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याच्या वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. स्वॅबचा अहवाल येण्यापुर्वीच संध्याकाळी ५ च्या सुमारास त्याचे निधन झाले. मृत वृध्दाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून कोरोनामुळे होणाऱ्या मृताचा हा सातवा बळी ठरला आहे. मृतांचा बीड जिल्ह्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.