धक्कादायक…. टेलिग्राम ग्रुपमधील मुलीशी सोयरीक होत नसल्याने तरुणाची आत्महत्या.

परभणी दि.25 जून – टेलिग्राम ग्रुपमधील (telegram group) प्रेम संबंध असलेल्या मुली सोबत सोयरीक होत नसल्याने रागाच्याभरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना 23 जून रोजी रात्रीच्या सुमारास सेलू येथील राजाराम नगर येथे घडली. स्वप्निल घाडगे असे मयत तरुणाचे नाव आहे. सेलू पोलीस स्टेशनला याप्रकरणी दि.24 जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

(Suicide of a young man for not having sex with a girl in a telegram group.)

याबाबत पोलिस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, विष्णू पांडुरंग गोंडगे रा. सोगाव पूर्व तालुका करमाळा जि. सोलापूर यांनी सेलू पोलिस स्टेशनला खबर दिली असून यामध्ये स्वप्नील घाडगे (वय 20) व्यवसाय शिक्षण, रा. सोगाव पूर्व तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याने टेलिग्राम (Telegram) वरून एमपीएससी ग्रुपमधील वडवणी जि.बीड येथील प्रेम संबंध असलेल्या मुली सोबत सोयरीक होत नसल्याच्या कारणाने 23 जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सेलू शहरातील राजाराम नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणा लगत उसाच्या फवारणीचे राऊंड विषारी औषध स्प्राईटच्या बाटली मध्ये टाकून पिल्याने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले जमादार एस. एस. वासलवार पोलिस हेडकॉन्स्टेबल बी. जि. पुरणवाड यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे पाठवले. शव विच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी सेलू पोलीस स्टेशन मध्ये कलम 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार एस. एस. वासलवार हे करीत आहेत. या प्रकरणात सेलू येथील पोलीस (Police) व मयत मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता मयत स्वप्निल घाडगे हा एमपीएससीची (MPSC) तयारी करत होता. दरम्यान, वडवणी जि. बीड येथील एमपीएससीची (MPSC) तयारी करणाऱ्या एका मुलीशी त्यांचे प्रेम संबंध जुळले. यामधून विवाह करण्यासाठी दोन्ही नातेवाईकाकडे बोलणी चालू होती.

या दरम्यान मुलीचे मामा सेलू येथील राजाराम नगर मध्ये असल्याकारणाने स्वप्निल घाडगे हा त्याचे मामा विष्णू गोंडगे यांना सोबत घेऊन 23 जून रोजी सेलू येथे मुलीच्या मामाकडे बोलणी करण्यासाठी आला होता. परंतु त्यानंतर हा प्रकार घडला अशी माहिती समोर आली. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या की घातपाताचे आहे हे मात्र सखोल चौकशी नंतरच समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!