“खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली” कार लोककलावंत छगन चौघुले यांचे निधन

मुंबई; दि.२१(प्रतिनिधी) लोककलावंत छगन चौघुले यांचे आज मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण ज्योत मालवली. ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ कार जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
छगन चौगुले यांच्या ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचं काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ या ध्वनिमुद्रिका विशेष गाजल्या. मात्र ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. लोककलेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील श्रोत्यांची मने जिंकणारा कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. छगन चौगुले यांनी लोककलेचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. तरीही स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर लोककलावंत म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. ते मुळात गोंधळी असल्याने त्यांनी सुरुवात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमापासून केली होती.