गेवराई पाठोपाठ परळीत कोरोनाचा बळी;

परळीः दि.२०(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील ३२ वर्षीय महिला दगावल्याच्या पाठोपाठ आज परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जि.प. उर्दू शाळेवर शिक्षक असलेले शेख जब्बार (४२) यांचा कोरोनावर उपचार सुरु असताना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाल्याचे वृत्त आले असुन जिल्ह्यात आज कोरोनाचे दोन बळी ठरले आहेत.
जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधित उपचारा दरम्यान दगावल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद येथील एम.जि.एम. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या शिक्षकावरही कोरोनाने घाला घातला. परळी येथील पेठ मोहला येथील रहिवाशी असणारे व सिरसाळा येथे उर्दू जि.प. शाळेत सहशिक्षक असलेले शेख जब्बार दि.१३ जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. दुपारी ३ च्या सुमारास त्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त परळीत आले. या घटनेमुळे परळीतील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.