चोविस तासात धारुरात दोन मृत्यू; आजची पॉझिटीव्ह संख्या ११….

किल्लेधारूर दि.२२ सप्टेंबर- गेल्या चोविस तासात धारुर शहरातील कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. आज धारुर कोविड सेंटरमध्ये केलेल्या ६६ ॲन्टीजन तपासणीत ८ जन, तर काल पाठवलेल्या ४ स्वॅब तपासणीत ३ असे एकुण ११ जन पॉझिटीव्ह आली आहेत.
काल दि.२१ सोमवार रोजी शहरातील एका ६५ वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर आज दि.२२ मंगळवार रोजी मयत झालेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे २४ तासात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तालुक्यात आजवरच्या मृतांची संख्या १३ झाली आहे. तालुक्यात दि.२१ सप्टेंबर पर्यंत ६००३ जनांची तपासणी झाली. यात १९५४ स्वॅब नमुने तर ४०४९ ॲन्टीजन चाचणी असुन यात ४४० जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. काल येथील कोविड सेंटरमधून ४ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आले होते. यापैकी ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत. तर ६६ जनांच्या ॲन्टीजन चाचणीत ८ जन पॉझिटीव्ह आली आहेत. आज एकुण ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहेत.
ॲन्टीजन तपासणीतील पॉझिटीव्ह
१. ७५ वर्षीय स्त्री, आयोध्या नगर, धारुर
२. ४० वर्षीय स्त्री, आयोध्या नगर, धारुर
३. ५२ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर
४. ५ वर्षीय, बालक, सोनार गल्ली, धारुर
५. ३ वर्षीय, बालक, सोनार गल्ली, धारुर
६. २५ वर्षीय, स्त्री, सोनार गल्ली, धारुर
७. ४२ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता. धारुर
८. ४९ वर्षीय पुरुष, पाटिल गल्ली, धारुर
(आरटीपिसिआर) स्वॅब अहवाल
९. ४९ वर्षीय पुरुष, चोरांबा, ह.मु. धारुर(मयत)
१०.४९ वर्षीय पुरुष, आंबेवडगाव, ता.धारुर
११.३१ वर्षीय पुरुष, कारी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.