जयंती निमित्त ११० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शासकीय सेवेतील भुमीपुत्रांचा नाविन्यपुर्ण उपक्रम

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त हातावर पोट असणाऱ्यां रोजगार बंद झाल्यामुळे एक नवीन उपक्रम वीर पांडुरंग चौकातील शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 110 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून एक नवीन संदेश दिला व या उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊनला सामेरे जात अनेक गोरगरीब कुटूंब उघड्यावर आली आहेत. या कुटूंबियातील लोकांना मदत करण्यासाठी या भागातील विजय गायसमुद्रे, रोहित गायसमुद्रे, राहुल गायसमुद्रे, सचिन गायसमुद्रे, अजय सिरसाट ,रत्नाकर डोंगरे, मिथुन गायसमुद्रे, सचिन डावकर, माणिक लोखंडे, अरुण वाघमारे, लोंढे सर या शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवत सहकार्य केले. यावेळी नायब तहसीलदार सुहास हजारे, स.पो.नि. सुरेखा धस, पत्रकार अनिल महाजन, हरिभाऊ मोरे, दिनेश कापसे, अतुल शिनगारे उपस्थित होते. तर हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता बंटी गायसमुद्रे, धम्मा गायसमुद्रे, विकास गायसमुद्रे, भागवत गायसमुद्रे, आकाश, धीरज, बादल, राहुल सर्व तरुण मित्रमंडळ वीर पांडुरंग चौक,फुले नगर यांनी विशेष परिश्रमघेतले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा अनोख्या पध्दतीने साजरी केल्याने सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.