बीड भाजपा जिल्हाध्यक्ष अडचणीत; पंकज कुमावत यांची आणखी एक धाडसी कारवाई.

बीड दि.29 डिसेंबर – अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आता भारतीय जनता पार्टीचे बीड (Beed) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के अडचणीत सापडले आहेत.

(Beed BJP district president in trouble; Another bold action by Pankaj Kumawat.)

सध्या बीड जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधिक्षक (Additional Superintendent of Police) पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध बायोडिझेल रॕकेटसह शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांच्यावर केलेल्या कारवाईने कुमावत चांगलेच चर्चेत आले. यानंतर कुमावत यांनी रात्री केलेल्या कारवाईमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेवर सुरु असलेल्या अलिशान पत्त्याचा क्लब असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी कारवाई केली. यात तब्बल 47 जुगारी आढळून आले. या कारवाईत अनेक महागडी वाहनं, मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिस (Police) जागा मालकासह चालक व अवैध जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. कुमावत यांनी अवैध दारु अड्डे, गुटखा, बायोडिझेल, बनावट खवा कारखाना आदी ठिकाणी यापुर्वी कारवाई केली आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही दिवसांपुर्वी त्यांच्याकडे देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या (SIT) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुमावत यांनी शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे खांडे यांना पदावरुन पदमुक्त व्हावे लागले होते. यामुळे आजच्या कारवाईनंतर भाजपा (BJP) काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!