कोरोंना विशेष
धारुरचा आणखी एक स्वॕब तपासणीला

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) तालुक्यातील सोनिमोहा येथील एकाचा स्वॕब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून काल पाठवलेल्या तेलगाव येथील इसमाचा स्वॕब उद्या दि.२ रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे यांनी दिली.
तालुक्यात मुंबईहून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे आरोग्य प्रशासन काळजी घेत आहे. ताप सदृश्य लक्षण आढळल्यामुळे व मुंबई प्रवासाचा इतिहास असल्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून सदरील इसमाचे स्वॕब लातुर येथील स्व. विलासराव देशमुख प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली. दरम्यान काल पाठवलेल्या तेलगाव येथील इसमाचा स्वॕब अन्कॉन्सेस आल्यामुळे उद्या नव्याने पाठवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.