धारुरमधील आणखी दोन भाग अनिश्चित काळासाठी बंद; आज ८ अहवालांची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) शहरात काल आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या रहिवास असलेल्या कसबा विभागातील स्वराज गल्ली व पेठेतील खाटीक गल्ली अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान काल पाठवलेल्या शहरातील ८ स्वॅब अहवालांची आज प्रतिक्षा आहे.

काल दि.३१ जुलै रोजी शहरातील दोघे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. बाधित रुग्णांच्या दोन गल्लीत स्वराज नगर कसबा व मस्जिद चौक, कुरेशी गल्लीत  संचारबंदी जाहिर करण्यात आली. तर यापुर्वी आढळलेल्या बाधितामुळे मेन रोडचा वडगावकर गल्ली, आयोध्या नगर व मेन रोडचा भाग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेला. यामुळे सध्या शहरातील तीन भाग कंटेनमेंट झोन म्हणून बंद आहेत. नवीन बाधितांच्या संपर्काचा शोध सुरु आहे. बाधिंताच्या कुटूंबियांना कोरोंटाईन करण्यात आले आहे. बाधिताच्या सहवासित व संपर्कातील लोकांची माहिती डॉ. मारुती लगड व डॉ. आमोल दुबे यांचे पथक घेत असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. दरम्यान काल पाठवण्यात आलेल्या ८ थ्रोट स्वॅबची माहिती रात्री येणार असुन यात हॉटस्पॉट झोन मधून प्रवास करुन आलेल्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!