कोरोंना विशेष

धारुरमध्ये आजपर्यंतची सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण संख्या; पहा किती आणि कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) काल पाठवलेल्या ५० थ्रोट स्वॅब पैकी आज १७ अहवाल पॉझिटीव्ह आली असून इतर ठिकाणाहून दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची तालुक्याची १९ ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.

शहर व तालुक्यात गेली २९ दिवस दररोज कमी जास्त संख्येत पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येणे सुरुच आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधील स्वॅब कलेक्शन सेंटरमधून ५० जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात सहवासितांची संख्या अधिक होती. यापैकी १७ सहवासित पॉझिटीव्ह आढळली आहेत. शहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. हे होत असताना मात्र नागरीक प्रशासनाच्या सुचना पायदळी तुडवत बाजारात मोठी गर्दी करत असल्याचे दिसुन येत आहे. आज आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांत धारुर शहरातील संख्या १२ आहे. पॉझिटीव्ह आढळून येणारे रुग्ण पुढील प्रमाणे आहेत.

1) 70 वर्षीय स्त्री, पोपळे वस्ती कारी, सहवासित
2) 42 वर्षीय पुरुष ,कुंभार गल्ली धारूर, सहवासित
3) 20 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली धारूर,नवीन
4) 33 वर्षीय पुरुष,कुंभारगल्ली धारूर, सहवासित
5) 18 वर्षीय पुरुष, कुंभारगल्ली धारूर, सहवासित
6) 38 वर्षीय पुरुष,कुंभारगल्ली धारूर, सहवासित
7) 12 वर्षीय स्त्री,कुंभारगल्ली धारूर, सहवासित
8) 9 वर्षीय स्त्री,कुंभारगल्ली धारूर, सहवासित
9) 6 वर्षीय पुरुष,कुंभारगल्ली धारूर, सहवासित
10) 65 वर्षीय पुरुष,कुंभारगल्ली धारूर, नवीन
11) 60 वर्षीय स्त्री,कुंभारगल्ली धारूर, नवीन
12) 20 वर्षीय पुरुष,कटघरपुरा धारूर,सहवासित
13) 17 वर्षीय पुरुष,गावंदरा, सहवासित
14) 70 वर्षीय पुरुष गावदंरा, सहवासित
15) 47 वर्षीय पुरुष केज रोड, धारूर,सहवासित
16) 67 वर्षीय पुरुष देवदहिफळ, नवीन
17) 32 वर्षीय पुरुष भोपा ,नवीन
18) 26 वर्षीय पुरुष, गांवदरा, सहवासित (अंबाजोगाई)
19) …. वर्षीय पुरुष, आडहिंगणी, नवीन(माजलगाव)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!