धारुरमध्ये आज ४ पॉझिटीव्ह; जिल्ह्यात ५१… पहा कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२६ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ७४ अहवाला पैकी शहरातील १ व तालुक्यातील ३ असे ४ जन पॉझिटीव्ह आली आहेत. जिल्ह्यात आज ५१ पॉझिटीव्ह आढळून आली आहेत.
आज तालुक्यात २७ व्या दिवशी ४ रुग्णांची भर पडली आहे. कालच्या ७४ स्वॅब पैकी शहरात १ व तालुक्यात ३ असे ४ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात तालुक्यातील कारी, तेलगाव व गांवदरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
१) ५० वर्षीय पुरुष , (कारी, ता धारूर, नवीन)
२) ६० वर्षीय महिला ,(गांवदरा, ता धारूर , नवीन)
३) ६५ वर्षीय महिला, (कुंभार वाडा, धारूर शहर, नवीन)
४) ३० वर्षीय पुरुष, (माऊली हॉस्पिटल , तेलगाव, ता.धारुर, सहवासित)
जिल्ह्यात आज ५१ रुग्ण आढळून आली आहेत. यात अंबाजोगाई २, परळी १०, बीड ९, माजलगाव ४, केज ९, आष्टी ४, धारुर ४, पाटोदा २, गेवराई ७ असे ५१ पॉझिटीव्ह आढळले आहेत.