धारुरमध्ये २३ पैकी ५ पॉझिटीव्ह; ॲन्टीजनसह जिल्ह्यात २३३

किल्लेधारूर दि.२२ आगस्टः- काल रात्री आलेल्या २३ अहवाला पैकी शहरातील ५ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात २ नवीन तर इतर ३ सहवासित आहेत. जिल्ह्यात आजही २१४८ जनांच्या ॲन्टीजन चाचणीत १७२ तर ४८६ स्वॅब अहवालापैकी ६१ अशी २३३ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली आहेत.
शहरात आज २२ व्या दिवशीही ५ रुग्णांची भर पडली आहे. २३ अतिजवळच्या हाय रिस्क संपर्कातील स्वॅब पैकी ५ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) ३७ वर्षीय पुरुष (वडगावकर गल्ली, धारुर शहर, सहवासित )
२)५६ वर्षीय पुरुष,(चांभारवाडा, धारुर शहर, नवीन )
३)३५ वर्षीय पुरुष,(पाटिल गल्ली, धारुर शहर, सहवासित)
४)३३ वर्षीय स्त्री,(पाटिल गल्ली, धारुर शहर, सहवासित)
५)६९ वर्षीय स्त्री(कटघरपुरा, धारुर शहर, सहवासित)
जिल्ह्यात आजही तीन शहरात ॲन्टीजन चाचणी घेण्यात आली. यात १७२ लोक पॉझिटीव्ह आढळून आली. यात अंबाजोगाई ९६३ पैकी ३०, माजलगाव ३६६ पैकी ६६, परळी ८१९ पैकी ७६ अशा एकुण २१४८ पैकी १७२ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.
याशिवाय ४८६ स्वॅब अहवाला पैकी ६१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. यात बीड २६, अंबाजोगाई १२, धारुर ५, गेवराई ७, केज ४, परळी, पाटोदा व आष्टी प्रत्येकी २ तर वडवणी एका रुग्णाचा समावेश आहे.